Ticker

6/recent/ticker-posts

श्री जनेश्वर महादेव मंदिर जवखेडा ठेंग येथे शिवपंचायतन यज्ञ व हनुमंतरायांची प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न


 गणेश पगारे 

जाफ्राबाद तालुक्यातील जवखेडा ठेंग येथील श्री क्षेत्र जनेश्वर महादेव मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे शिवपंचायतन यज्ञ सोहळा मोठ्या थाटात पार पडला.

या सोहळ्याच्या सविस्तर माहितीप्रमाणे, श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज गोसेवा आश्रम, श्री क्षेत्र जवखेडा, तसेच परम पूज्य श्री स्वामी माधव गिरीजी बाबा आणि परम पूज्य श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पावन सान्निध्यात हा यज्ञ सोहळा संपन्न झाला.

यावेळी जिल्ह्याचे स्वच्छता दूत श्री पंजाबराव भुजंगराव लहाने यांचा समस्त गावकरी व कमिटीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. यज्ञाच्या पाच दिवसांच्या कालावधीत त्यांनी श्रमदानातून योगदान देत स्वच्छता राखण्यास हातभार लावला.

या यज्ञ सोहळ्यात संत-महंतांच्या उपस्थितीत विविध धार्मिक विधी पार पडले, तसेच परिसरातील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला आजी-माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, तसेच सर्व सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यज्ञ सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व भाविक, ग्रामस्थ व कमिटीचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या