मौजे येवता शिवारातील शेतकऱ्यांनी वहीवाटीचा बंद रस्ता खुला करण्यासाठी तहसिल कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या या लढ्याला आता दिलासा मिळाला आहे. तहसिलदार सारिका भगत यांनी सदर प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया देत सांगितलं की, रस्ता खुला करण्यासाठी उद्या महसूल आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई केली जाणार आहे.
तहसिलदार सारिका भगत यांनी सांगितले की
"या प्रकरणी अर्जदार बाजूने निकाल पारित झाला आहे. मागील दोन तारखांना – १८ आणि २० जून रोजी आमच्या पथकाने घटनास्थळी जाऊन रस्ता खुला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संविधानशील परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्या वेळी प्रत्यक्ष अंमलबजावणी करता आली नाही. मात्र आता उद्याच्या तारखेला आम्ही पोलीस व महसूल विभागासह संयुक्तपणे कारवाई करून रस्ता खुला करू."
शेतकऱ्यांचा संघर्ष अखेर रंगतोय का?
या प्रतिक्रिया नंतर शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात समाधानाचं वातावरण असलं, तरीही प्रत्यक्ष कारवाई होईपर्यंत त्यांचा संघर्ष सुरू राहणार आहे.
"आमचा रस्ता आम्हाला हवा आहे. आश्वासनं खूप मिळालीत, आता प्रत्यक्ष कृती पाहिजे!" – अशी भावना उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
लहानग्यांचा हृदयद्रावक आवाज:
शाळकरी मुले हातात फलक घेऊन, "रस्ता द्या! शाळेत जायचंय!" अशी आर्जव करत आहेत. हा लहानग्यांचा टाहो प्रशासनाच्या मनाला भिडतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
उद्याच्या कारवाईकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तहसिल कार्यालयाने दिलेल्या आश्वासनानुसार प्रत्यक्ष रस्ता खुला होतो की नाही, हे पाहणं गरजेचं आहे.
अधिक अपडेट्ससाठी “आधुनिक महाराष्ट्र” न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करत रहा शेतकऱ्यांचा आवाज!


0 टिप्पण्या