Ticker

6/recent/ticker-posts

माहोरा येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात राजमाता जिजाऊ जयंती , तसेच स्वामी विवेकानंद जयंती नवनिर्वाचित सरपंच ,उपसरपंच यांचा सत्कार .


 ‌माहोरा प्रतिनिधी जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित सरपंच श्री गजानन पाटील लहाने ,उपसरपंच सय्यद हबीबभाई , वैद्यकीय अधिकारी डॉ श्री अशोकरावजी वाघमारे , आरोग्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश मुरकुटे पाटील , यांच्या हस्ते मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच मा जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश ज्योत टाकण्यात आला यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा येथोचित सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला . या सत्कार प्रसंगी सरपंच श्री गजानन पाटील लहाने यांनी बोलताना सांगितले की गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहुन आरोग्यवर्धिनी केंद्राच्या केंद्रात पाण्याची सुविधा रस्ते वीज या समस्या तात्काळ सोडविण्यात येईल,आरोग्यवर्धिनी केंद्रात असलेले आरोग्य कर्मचाऱ्यांचे रिक्त पदे तात्काळ भरण्यासाठी आपण प्रयत्न करू असे बोलताना सरपंच श्री लहाने यांनी म्हटले आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य संगीताबाई भानदास बोर्डे,उमाबाई सुभाष लहाने,प्रभाकर शहागडकर नाना ,बाबासाहेब बोरसे,भास्कर सोनवणे,सुखदेव साबळे,हर्षल जाधव,कविताबाई कैलास लहाने ,सय्यद गुलाब ,चंदू शिरसाठ, गुलाब कळम ,यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य , वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोकरावजी वाघमारे,डॉ विशाल काटकर ,डॉ मंगेश भोंडे ,डॉ शारदा मेहेत्रे ,डॉ जागृती सावळे ,आरोग्य कर्मचारी श्रीमती अर्चना इंगळे आम्रपाली मोरे जयश्री मेहकरकर, ज्योती जाधव ,दगडाबाई पठाण, बेबीसरोजा उदावंत ,प्रभाकर बोर्डे ,गौतम दिवेकर , संजय आस्तुरे ,नइम पठाण, अरुण साबळे, प्रकाश काकफळे कुलदीप कुरील, सूर्यनारायण, राधा डोईफोडे, श्री खऽसे गणेश गायकवाड,यांची यावेळी उपस्थिती होती .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या