जालना, दि. 20 फेब्रुवारी :- जालना जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी सेविकास व मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजना तालुका प्रकल्पनिहाय पद भरती करण्यात येत आहे. तरी संबंधित महिलांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी कोमल कोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
भोकरदन-1 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 4 व मदतनीस 14 पदे भरण्यात येणार आहेत.
भोकरदन-2 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 3 व मदतनीस 20 पदे भरण्यात येणार आहेत.
जालना-1 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 5 व मदतनीस 25 पदे भरण्यात येणार आहेत.
अंबड-1 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 18 व मदतनीस 44 पदे भरण्यात येणार आहेत.
अंबड-2 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 9 व मदतनीस 17 पदे भरण्यात येणार आहेत.
घनसावंगी-1 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 13 व मदतनीस 33 पदे भरण्यात येणार आहेत.
घनसावंगी-1 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 18 व मदतनीस 39 पदे भरण्यात येणार आहेत.
जाफ्राबाद प्रकल्पात अंगणवाडी सेविका 12 व मदतनीस 26 पदे भरण्यात येणार असून...
तसेच
परतूर प्रकल्पात अंगणवाडी सेविका 9 व मदतनीस 16 पदे आणि
मंठा प्रकल्पात अंगणवाडी सेविका 5 व मदतनीस 29 पदे भरण्यात येणार असून या दोन प्रकल्पात अर्ज स्विकारण्याचा दि.28 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे.
जालना-2 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 12 व मदतनीस 35 पदे भरण्यात येणार असून अर्ज स्विकारण्याचा दि.21 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे.
बदनापूर प्रकल्पात अंगणवाडी सेविका 6 व मदतनीस 44 पदे भरण्यात येणार असून अर्ज स्विकारण्याचा दि.25 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-


0 टिप्पण्या