गणेश पगारे
माहोरा येथे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण मोठ्या उत्साहात पार पडले. कैलासवासी संपतराव कासोद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच कुमारी अश्विनी राजेंद्र लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त, डॉ. कासोद मित्र मंडळ व आकाश राजेंद्र लोखंडे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विशेष कार्यक्रम व मान्यवरांची उपस्थिती
दिनांक ११ मार्च रोजी जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांना जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य संतोष लोखंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या वेळी कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते, त्यामध्ये कृ.उ.स.माजी सभापती भाऊसाहेब पाटील,माजी सभापती साहेबराव कानडजे,कृ.उ.बा.स.सभापती गोविंदराव पंडित,माहोरा गावचे सरपंच गजानन लहाने,माहोरा गावचे उपसरपंच बाबासाहेब बोरसे, कार्यक्रमाचे आयोजक डॉ. रवींद्र कासोद,कोल्हापूरच्या उपसरपंच कल्पना जाधव,माहोरा गावच्या माजी सरपंच वैशालीताई कासोद भोकरदनच्या वैद्यकीय अधिकारी मृणालीताई कासोद,माजी उपसरपंच भानदास बोर्डे,ग्रामविकास अधिकारीम राजेंद्र लोखंडे,नवलशिंग राजपूत,ललिता लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते
चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड प्रतिसाद
या विशेष प्रक्षेपणाला माहोरा व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. चित्रपट सुरू होताच उपस्थित नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि त्याग मोठ्या पडद्यावर पाहताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. विशेषतः तरुणांमध्ये प्रेरणादायी ऊर्जा निर्माण झाली.
संभाजी महाराजांच्या शौर्याचा जागर
छावा चित्रपटाने उपस्थित प्रेक्षकांना संभाजी महाराजांच्या जीवनसंघर्षाची जाणीव करून दिली. इतिहासातील पराक्रमी योद्ध्यांच्या कथा नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात, हा यामागील उद्देश सफल झाल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल डॉ. रवींद्र कासोद व राजेंद्र लोखंडे यांनी सर्व सहकाऱ्यांचे आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानले. "संभाजी महाराजांचे जीवन आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आणि अशा ऐतिहासिक चित्रपटांचे आयोजन भविष्यातही करावे," अशी मागणी नागरिकांनी केली.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी उद्धव झाल्टे,भरत कासोद,शीतल आढाव,संतोष पोटे,मनोहर वाघ, अशोक खरात,ईश्वर इंगळे, पांढरीनाथ शेळके, वैभव मुट्ठे, निशांत कासोद, अक्षय कासोद, आदित्य मट्ठे, शकील पठाण, बाळासाहेब गवले, गणेश पगारे, राजू गौरकर, पंकज जाधव यांनी विशेष मेहनत घेतली.




0 टिप्पण्या