गणेश पगारे
महाराष्ट्र राज्याच्या पंचायत राज कमिटीच्या अध्यक्षपदी सन्माननीय आमदार आदरणीय संतोष पाटील दानवे यांची निवड झाल्याने त्यांचा मुंबई येथील विधानभवन येथे जाऊन युवाउद्योजक कृष्णा पाटील गाढे यांनी सत्कार केला. तसेच,भोकरदन तालुक्यातून युवाउद्योजक सुनील पोटे यांनीही त्यांचा सन्मान केला.
यावेळी दीपक पा. वाकडे, जाफ्राबाद पंचायत समितीचे सभापती दगडू अण्णा गोरे, कौसर भैया शेख, कृष्णा शिरसाट आणि सुनील पोटे उपस्थित होते. या भेटीदरम्यान, कार्यकर्त्यांनी तळागळातील सर्वसामान्य जनतेच्या अडचणी व अडथळ्यांचा मुद्दा आमदार साहेबांच्या समोर मांडला. जनतेच्या समस्या, प्रशासनातील अडथळे आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावर आमदार संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील कुठल्याही नागरिकाच्या सुख-दुःखाच्या प्रश्नांवर शंभर टक्के मार्ग काढण्यासाठी वचनबद्ध राहण्याचे आश्वासन दिले.
तसेच, महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी मंत्रालयात भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याशिवाय, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचीही मंत्रालय व त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
ही भेट अत्यंत सकारात्मक आणि भविष्यातील विकासात्मक निर्णयांसाठी महत्त्वपूर्ण ठरली.




0 टिप्पण्या