गणेश पगारे
माहोरा: स्थानिक नागरिक आणि सर्वधर्मीय बांधवांच्या वतीने आज (दि. ८) माहोरा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता.
संतोष देशमुख यांची हत्या अमानुष आणि क्रूर पद्धतीने करण्यात आली असून, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गावकऱ्यांनी एकजुटीने बंद यशस्वी केला.
बंददरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जाफ्राबाद पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.
आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, गावकऱ्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.


0 टिप्पण्या