Ticker

6/recent/ticker-posts

माहोरा येथे ‘छावा’ चित्रपटाचे विशेष प्रेक्षपण

 


गणेश पगारे 

माहोरा, ता. जाफ्राबाद, जि. जालना – कै. संपतराव गोविंदराव कासोद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माहोरा येथे एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाचे मोफत प्रेक्षपण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मंगळवारी, दि. 11 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता जिल्हा परिषद शाळा, माहोरा येथे पार पडणार आहे.


कार्यक्रमाचे आयोजन आणि उद्देश


या विशेष कार्यक्रमाचे आयोजन डॉ. कासोद साहेब मित्र मंडळ,राजेंद्र लोखंडे मित्र मंडळ, माहोरा यांच्या वतीने करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ हा चित्रपट प्रेक्षकांना इतिहासाची प्रेरणा देणारा ठरेल. संभाजी महाराजांच्या पराक्रमाने आणि त्यागाने महाराष्ट्राच्या इतिहासात अढळ स्थान मिळवले आहे. त्यांच्या गाथेला उजाळा देण्यासाठी आणि युवकांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने या चित्रपटाचे प्रेक्षपण करण्यात येणार आहे.


सर्व नागरिकांना निमंत्रण


हा कार्यक्रम पूर्णतः मोफत असून, माहोरा तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक डॉ. रवींद्र कासोद च्या वतीने करण्यात आले आहे. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि नवीन पिढीपर्यंत आपल्या इतिहासाची प्रेरणादायी कथा पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहून योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या