गणेश पगारे
माहोरा, ७ मार्च : बुलढाणा जिल्ह्यात समाजसेवेचे नवे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या राजर्षी शाहू परिवार आणि वन बुलढाणा मिशन यांच्या वतीने, मा. संदिपदादा शेळके (राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष, वन बुलढाणा मिशनचे संकल्पक व शिवसेना (उ.बा.ठा) बुलढाणा जिल्हा समन्वयक) यांच्या वाढदिवसानिमित्त ४ फेब्रुवारी ते १३ मार्च या कालावधीत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अनुषंगाने ७ मार्च रोजी माहोरा शाखेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अनेक सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि रक्तदात्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सिल्लोड विभागाचे विभागीय व्यवस्थापक किरण बोर्डे सर, फकिरबा जाधव, माजी सभापती चंद्रकांत चोतमोल, स्थानिक संचालक अण्णा पाटील इंगळे, संजय जाधव, गजानन कोरडे, माजी सरपंच विजय बोराडे, खातेदार दादाराव गडकरी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात सुनीता दिलीप बोर्डे, डिगांबर ढवळे, माया बोर्डे, मालिनी बोर्डे, डॉ. प्रकाश आगळे, अमोल सुसर आदी रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते आणि या माध्यमातून अनेकांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे राजर्षी शाहू परिवार आणि वन बुलढाणा मिशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या