Ticker

6/recent/ticker-posts

जुई-केळणा संगमावर महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रा

भाविक भक्तांचे श्रद्धास्थान संगमेश्वर भगवान

गणेश पगारे | माहोरा

चारशे वर्षांपासून श्रद्धेचे प्रतीक असलेल्या संगमेश्वर महादेव मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने भव्य यात्रा भरते. या पवित्र स्थळी हजारो भाविक मोठ्या भक्तिभावाने हजेरी लावतात आणि शिवभक्तीमध्ये तल्लीन होतात.

इतिहास आणि भक्तांची श्रद्धा


प्राचीन काळापासून जुई-केळणा संगमावर वसलेले हे संगमेश्वर महादेव मंदिर भक्तांचे श्रद्धास्थान राहिले आहे. ह.भ.प. श्रीरंग कमळुबा कड आणि ह.भ.प. प्रल्हाद महाराज कड यांच्या वडिलांनी १९७२ साली या मंदीराच्या जीर्णोद्धारासाठी पंचक्रोशीतील सर्व गावांना आवाहन केले होते. त्यानंतर १८ ते २० वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भक्तगण येऊ लागले.

महाशिवरात्री उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम


महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर येथे विशेष धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मंदिरात दररोज पूजा, आरती आणि भजन-कीर्तन आयोजित केले जाते. तसेच भागवत सप्ताहाचे आयोजन होऊन भाविकांना आध्यात्मिक अनुभूती मिळते.

तीर्थक्षेत्राचा दर्जा आणि मूलभूत सुविधांची मागणी


भाविक भक्तांची वाढती गर्दी पाहता या पवित्र स्थळाला अधिकृत तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, तसेच भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिक आणि भक्तगणांनी केली आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या