Ticker

6/recent/ticker-posts

जाफराबाद तालुका वकील संघ निवडणूक: अटीतटीच्या लढतीत अँड. विनोद डिगे अध्यक्षपदी विजयी

 

गणेश पगारे 

जाफराबाद, ता. 28: जाफराबाद तालुका वकील संघाच्या 2025-2026 या कार्यकालासाठी झालेल्या निवडणुकीत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अँड. विनोद डिगे यांनी अँड. पी. एल. काबरा यांचा 13 मतांनी पराभव करून विजय मिळवला.

उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या लढतीत अँड. ओम सोनोनें यांनी शे. सादीक यांचा 12 मतांनी पराभव केला. तर सचिव पदासाठी अँड. गणेश बरोदे यांनी अँड. शिराळकर यांचा केवळ 2 मतांनी पराभव करून विजय मिळवला.

या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड. विकास जाधव आणि अँड. शरद वाकडे यांनी जबाबदारी पार पाडली. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत वकील संघाच्या सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर वकील संघाच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ वकिलांनी मार्गदर्शन करत संघाच्या भविष्यातील कार्याविषयी अपेक्षा व्यक्त केल्या. नव्या कार्यकारिणीने संघाच्या विकासासाठी एकजूट होऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या