दि. १९ मार्च २०२५ - माजी केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री नामदार श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त काल (दि. १८ मार्च) भोकरदन येथील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी तुफान गर्दी केली.भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी या सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला.
यावेळी माहोरा येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र जी कासोद,ग्राम विकास अधिकारी राजेंद्रजी लोखंडे आणि पत्रकार संतोष वरपे यांनी रावसाहेब पाटील दानवे यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देतानाचे क्षण छायाचित्रांमध्ये टिपले गेले. कार्यकर्त्यांनी फुले, शाल आणि भेटवस्तू देऊन दानवे यांचा सन्मान केला.
रावसाहेब पाटील दानवे यांनी आपल्या कार्यकाळात रेल्वे आणि खाण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत कार्यकर्त्यांनी त्यांना दीर्घायुष्याच्या शुभकामना दिल्या. "रावसाहेब दानवे दादा आमचे प्रेरणास्थान आहेत," असे डॉ.रवींद्रजी कासोद म्हणाले. दानवे यांनी सर्वांचे आभार मानले आणि जनसेवेचा वसा पुढे सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले.
या सोहळ्याने भोकरदन परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. माहोरा आणि भोकरदन-जाफ्राबाद येथील नागरिकांनी हा वाढदिवस जल्लोषात साजरा केला


0 टिप्पण्या