Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती संभाजीनगरजवळ भीषण अपघात; ट्रक उलटून सहा उसतोड मजुरांचा मृत्यू, नऊ गंभीर जखमी

 

गणेश पगारे 

कन्नड (छत्रपती संभाजीनगर) : पिशोर मार्गावरील कोळसवाडी खांडी येथे रविवारी (१० मार्च) पहाटे झालेल्या भीषण अपघातात ऊसाने भरलेला ट्रक उलटून सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताचा तपशील

रविवारी मध्यरात्री १२:३० वाजता ट्रक (क्रमांक: GJ 10 TV 8386) चिंचोली येथून रसवंतीसाठी ऊस घेऊन गुजरातकडे जात होता. ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरलेला होता आणि वेगही अधिक होता. कोळसवाडी खांडी येथे ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या खाली उलटला. ट्रकच्या टपावर आणि केबिनमध्ये बसलेले ऊसतोड मजूर उसाच्या खाली दबल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर नऊ जण गंभीर जखमी झाले.

मृतांची नावे:

1. किसन धर्मा राठोड (३२, रा. सातकुंड, ता. कन्नड)

2. कृष्णा मूलचंद राठोड (३०, रा. सातकुंड)

3. मिथुन मारू चव्हाण (२६, रा. सातकुंड)

4. मनोज नामदेव चव्हाण (२३, रा. सातकुंड)

5. विनोद नामदेव चव्हाण (२६, रा. सातकुंड)

6. ज्ञानेश्वर देविदास चव्हाण (३०, रा. बेलखेड तांडा)

गंभीर जखमी:

1. इंदलचंद प्रेमचंद चव्हाण (३१, रा. सातकुंड)

2. लखन छगन राठोड (२९, रा. सातकुंड)

3. सचिन भागिनाथ राठोड (२२, रा. सातकुंड)

4. राहुल नामदेव चव्हाण (१९, रा. सातकुंड)

5. रवींद्र नामदेव राठोड (२५, रा. सातकुंड)

6. सागर भागिनाथ राठोड (२५, रा. सातकुंड)

7. राणीबाई लखन राठोड (३०, रा. सातकुंड)

8. इस्माईल अब्दुल जेडा (वाहनचालक, रा. गुजरात)

9. उमर मुसा जेडा (क्लीनर, रा. गुजरात)

अपघातानंतरचा परिस्थिती

अपघात होताच परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. स्थानिक पोलिसांनीही त्वरित मदतकार्य हाती घेतले. जखमींना तातडीने चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर आणि कन्नड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

अपघाताचे संभाव्य कारण

या अपघातामागे ट्रकचा अतिवेग आणि क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरल्याने तोल जाऊन वाहन पलटी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

परिसरात हळहळ

या अपघातामुळे सातकुंड आणि बेलखेड तांड्यात शोककळा पसरली आहे. ऊसतोड मजूर हे उपजीविकेसाठी स्थलांतर करणारे असतात, मात्र अशा दुर्घटनांमुळे त्यांच्या कुटुंबांवर मोठे संकट कोसळते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या