Ticker

6/recent/ticker-posts

वडाळा शिवारात प्रताप ताठे यांची गळफास घेऊन आत्महत्या


गणेश पगारे 

माहोरा,९ मार्च: वडाळा शिवार येथे प्रताप गजेबा ताठे (वय अंदाजे ४५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (रविवार) दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार, प्रताप ताठे यांनी स्वतःच्या घराशेजारील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच जाफ्राबाद पोलीस ठाण्याच्या माहोरा बिटचे जमादार गजानन गावंडे, पोलीस कॉन्टेबल विजय जाधव, पोलीस डोईफोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र, माहोरा येथे पाठवला. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले असून शवविच्छेदन उद्या (१० मार्च) सकाळी करण्यात येणार आहे.

या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या