Ticker

6/recent/ticker-posts

जालना येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेले श्री. जगदीश मिनियार (IAS) यांचे स्वागत

गणेश पगारे 

जालना – जिल्ह्यात नव्याने मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या श्री. जगदीश मिनियार (IAS) यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून स्वागत करण्यात आले. नवलसिंग राजपूत, शिवाजी राजपूत, गजानन राजपूत, कौतिक कासोद व रामदास कानडजे यांनी श्री. मिनियार यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

श्री. मिनियार यांची प्रशासकीय कारकीर्द उल्लेखनीय असून त्यांनी यापूर्वी अनेक ठिकाणी प्रभावी प्रशासन दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

या स्वागतप्रसंगी सामाजिक व स्थानिक विकासाच्या विविध मुद्द्यांवरही चर्चा झाली. उपस्थित मान्यवरांनी श्री. मिनियार यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या