सम्राट अशोक शिक्षण संस्था, भोकरदन संचलित दीपभारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, माहोरा येथे आज दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी सम्राट अशोक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पांडे एस. के. यांच्या हस्ते सम्राट अशोक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात बोलताना त्यांनी सम्राट अशोक यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, कलिंग युद्धानंतर झालेल्या भीषण नरसंहारामुळे सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि अहिंसा, सत्य, प्रेम व सहिष्णुतेच्या मार्गाने राज्यकारभार केला,त्यांच्या कार्यकाळात भारताला 'सोने की चिडिया' अशी ओळख मिळाली. त्यांनी संपूर्ण भारतभर ८४,००० शिलालेख बांधून बौद्ध धर्माचा प्रसार केला होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. लोढे एन.एम., श्रीमती गोलटगावकर मॅडम, श्री. सोन्ने आर.आर., श्री. शिंगाडे एस.एल., श्री. लहाने आर.एस., श्री. दाभाडे एस.आर., श्री. शेजुळ के.एस., श्री. पैठणे आर.एच., श्री. शेजुळ एस.आर., श्री. भिंगारे जी.पी. व श्री. पगारे जे.एस. यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. लहाने आर.एस. यांनी केले.


0 टिप्पण्या