Ticker

6/recent/ticker-posts

माहोरा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात साजरी

 


गणेश पगारे 

जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती राष्ट्रभक्तीच्या भावनेने साजरी करण्यात आली. २८ मे रोजी ग्रामसंसद कार्यालयात सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. स्वातंत्र्यसंग्रामात क्रांतिकारक भूमिका बजावणारे आणि अखंड हिंदु राष्ट्राचे पुरस्कर्ते असलेल्या सावरकरांच्या कार्याचा यावेळी उपस्थितांनी गौरवपूर्वक स्मरण केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच गजानन पाटील लहाने होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव पाटील लहाने, ग्रामपंचायत सदस्य सय्यद हबीब स. कमाल, ज्येष्ठ नेते वामनराव पाटील लहाने, नारायणराव बोरसे, पत्रकार बाळासाहेब गव्हले, सुनील पानसरे, शिवाजी सिरसाठ, रमेश पोटे, सोमनाथ चौधरी, गजानन साबळे, प्रकाश सिरसाठ, लक्ष्मण वाघ, विजय इंगळे, गणेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात वक्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे महत्त्व पटवून देताना, तरुण पिढीने त्यांचे विचार अंगीकारून देशसेवेसाठी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संयोजन ग्रामसंसद कार्यालयाच्या वतीने करण्यात आले होते.

जयंतीनिमित्त ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आणि संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या