गणेश पगारे
"पर्यावरणाचे रक्षण हेच आपल्या वसुंधरेचे संवर्धन आहे. वृक्ष, प्राणी, पक्षी हे वसुंधरेचे प्राण असून त्यांचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे," असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडामंत्री दत्तामामा भरणे यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने तळजाई(पुणे) येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर, उद्योजक वसंतराव देशमुख (पुणे), सह्याद्री अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. कैलासराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण जागरूकता वाढविण्याचा आणि हरित आच्छादन वाढविण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी घेतला.
दत्तामामा भरणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "फक्त वृक्षारोपण पुरेसे नाही, तर लावलेल्या वृक्षांचे संगोपन हे अधिक महत्त्वाचे आहे. आजच्या पिढीसाठी आणि उद्याच्या भविष्यासाठी निसर्गाचे रक्षण अनिवार्य आहे."
आमदार तापकीर यांनीही सांगितले की, "माणसाने निसर्गाची लूट थांबवून त्याच्याशी समरस होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने एका झाडाची जबाबदारी घेतली, तर आपण हरित भारताची दिशा निश्चित करू शकतो."
उद्योजक वसंतराव देशमुख यांनी पर्यावरणपूरक उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले, तर डॉ. कैलासराव देशमुख यांनी सह्याद्री अर्बन बँकेमार्फत ‘हरित माहोरा’ उपक्रम हाती घेण्यात येत असल्याचे जाहीर केले.
कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ व स्थानिक सामाजिक संस्थांच्या सहकार्याने करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण होऊन पर्यावरण दिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणासोबत जनजागृतीही:
कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी निसर्ग विषयक माहितीपत्रके वाटण्यात आली तसेच पर्यावरण संवर्धनासाठी शपथ घेण्यात आली.



0 टिप्पण्या