गणेश पगारे
कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. संजनाताई जाधव यांची महाराष्ट्र विधानमंडळाच्या महिला व बालकांच्या हक्क आणि कल्याण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली. या नियुक्तीचे सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय वर्तुळात स्वागत होत असून, विविध क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांना सदिच्छा भेटी देत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
याच अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कासोद, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र लोखंडे व जनार्दन जाधव यांनी आमदार संजनाताई जाधव यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना आदर्श शिक्षक कै. संपतराव गोविंदराव कासोद यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा बक्षीस वितरण समारोह सोहळ्याचे विशेष आमंत्रणही दिले.
आ. संजनाताई जाधव यांनी दिलेल्या जबाबदारीचे गांभीर्य लक्षात घेऊन महिलांचा व बालकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे यावेळी सांगितले. त्यांचे कार्यक्षेत्र आणि लोकहितकारी भूमिका भविष्यातही प्रभावी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


0 टिप्पण्या